पुणे महापालिकेत भाजपचे महिला कार्ड जोरात,  उमेदवारी यादीतून लाडक्या बहिणींला पाठबळ स्पष्ट 

पुणे :

पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेली उमेदवारांची यादी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. एबी फॉर्म वाटपानंतर समोर आलेल्या या यादीतून भाजपने महिलांना प्राधान्य देत एक ठोस आणि स्पष्ट संदेश दिला आहे. महिलांच्या सशक्तीकरणाचा मुद्दा केवळ घोषणांपुरता न ठेवता तो प्रत्यक्ष निवडणुकीत उतरवल्याचे या यादीतून दिसून येते.

यंदा भाजपने पुण्यात महिलांना सर्वाधिक संधी देत नवा विक्रम केला आहे. एकूण १६५ जागांपैकी तब्बल ९१ जागांवर महिला उमेदवार देण्यात आले असून, हा आकडा इतर पक्षांच्या तुलनेत लक्षणीय आहे. विशेष बाब म्हणजे ही उमेदवारी केवळ महिला आरक्षित वार्डांपुरती मर्यादित न ठेवता, सर्वसाधारण वार्डांमध्येही महिलांवर विश्वास दाखवण्यात आला आहे. पुरुषांसाठी असलेल्या सर्वसाधारण वार्डांतूनही नऊ महिलांना संधी देण्यात आल्याने भाजपची भूमिका अधिक ठळक झाली आहे.

या निर्णयामुळे पुण्याच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. ‘लाडकी बहीण’सारख्या योजनांच्या माध्यमातून मांडलेली भूमिका आता निवडणूक रणांगणात प्रत्यक्ष उतरवल्याचे चित्र आहे. पक्षातील नेत्यांच्या मते, महिलांची प्रशासकीय क्षमता, समाजाशी असलेला जवळचा संपर्क आणि स्थानिक प्रश्नांची जाण लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे.शिक्षण, आयटी, उद्योग आणि सामाजिक चळवळींचा भक्कम पाया असलेल्या पुणे शहरात महिलांचे नेतृत्व वाढवणे ही काळाची गरज असल्याचे भाजपचे मत आहे. त्यामुळे यंदाच्या महापालिका निवडणुकीत महिलांना केवळ प्रतिनिधित्व देण्यापेक्षा निर्णयप्रक्रियेत महत्त्वाची भूमिका देण्याचा प्रयत्न पक्षाकडून होत असल्याचे या उमेदवारी यादीतून स्पष्ट होते. महत्त्वाची भूमिका देण्याचा प्रयत्न पक्षाकडून होत असल्याचे या उमेदवारी यादीतून स्पष्ट होते.

आणखी वाचा   कोरेगाव पार्क–मुंढवा भूखंड प्रकरणी मोठी कारवाई : दोन अधिकाऱ्यांची सेवेतून हकालपट्टी