एटी किंग्सने पटकावला एमएफसीएल पर्व 5 चा चषक

पुणे :

मार्केट यार्ड भुसार बाजार पेठेतील व्यापाऱ्यांची लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्केट यार्ड फ्रेंड्स क्रिकेट लीग मध्ये आनंद अग्रवाल व संदीप अग्रवाल यांच्या एटी किंग्स संघाने शानदार कामगिरी करत आरएसजी रायझर्स संघाचा 19 धावांनी पराभव करून चषकावर आपले नाव कोरले.

अत्यंत चुरशीने झालेल्या अंतिम सामन्यात एटी किंग्सने प्रथम फलंदाजी करत 112 धावांचे आव्हान उभे केले. प्रत्युत्तरात RSG रायझर्स संघाला 97 धावांत रोखत AT किंग्सने एमएफसीएल पाचव्या पर्वाचे विजेतेपद मिळवले. अंतिम सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीसाठी दीपक चौधरी याला ‘सामनावीर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

स्पर्धेतील वैयक्तिक पुरस्कार सुशांति आणि कंपनीतर्फे
चेतन चौधरी याला सर्वोत्कृष्ट फलंदाज (₹5,100),
आदित्य बोगावत याला सर्वोत्कृष्ट गोलंदाज (₹5,100),
रितेश अग्रवाल याला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक (₹5,100),
तर रमेश मुळेवा याला स्पर्धेचा मानकरी म्हणून ₹21,000 चे बक्षीस देण्यात आले.

विजेत्या एटी किंग्स संघाला अनिस मेनन  यांच्या वतीने ₹1,00,000, तर उपविजेत्या RSG रायझर्स संघाला संतोष लगडे यांच्या वतीने ₹51,000 रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. मेडल व ट्रॉफीचे प्रायोजन मंत्रा प्रॉपर्टीज यांनी केले.

अत्यंत दिमाखदार समारंभात स्पर्धेचे मुख्य प्रायोजक रितेश अग्रवाल व्हेंचर्स व सहप्रायोजक राजेश कोतवाल यांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. अंतिम सामन्यापूर्वी आयोजित करण्यात आलेली गंगा आरती हे विशेष आकर्षण ठरले. मंत्रोच्चार आणि भक्तिमय वातावरणाने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेला मार्केट यार्ड येथील पोलीस स्टेशन च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती चे सचिव राजाराम धोंडकर आणि भुसार विभाग प्रमुख प्रशांत गोते तसेच अनेक मान्यवरांनी भेट दिली. स्पर्धेदरम्यान महिला, लहान मुले तसेच मार्केट यार्ड येथील गूळ व भुसार विभागातील व्यापारी व दलाल बंधूंनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.मुकेश गोयल, कुणाल ओस्तवाल, जतीन शहा, कमलेश गोयल, सुदर्शन भंडारी, धनेश शिंगवी आणि सचिन रायसोनी यांनी या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले.

आणखी वाचा   महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात चार दिवस ‘ड्राय डे’; तळीरामांना मोठा धक्का

मार्केट यार्डमधील गूळ व भुसार बाजारपेठेतील सर्व वयोगटातील व्यापाऱ्यांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने एमएफसीएल ची स्थापना करण्यात आली असून, यंदा या स्पर्धेचे पाचवे वर्ष यशस्वीरीत्या पूर्ण झाले.