एक बाई आणि बारा भानगडी

पुणे :

पुण्यात सध्या एकाच महिलेच्या अनेक वादग्रस्त कृत्यांची चर्चा आहे. गौरी वांजळे असं या महिलेचं नाव आहे. तिची कहाणी म्हणजे ‘एक बाई आणि बारा भानगडी’ अशा स्वरूपाची आहे.

पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणे, गुंगीचे औषध देणे, खासगी फोटो काढून ब्लॅकमेल करणे, आणि ॲसिड हल्ला करणे अशा एकामागून एक गंभीर घटनांमुळे ही महिला चर्चेत आली आहे. पुणे शहर पोलीस स्टेशनमध्ये तिच्या विरोधात सध्या 3 वेगवेगळे गुन्हे दाखल असून, तिने केवळ पुरुषांनाच नाही तर अनेक गरजू महिलांनाही ‘वकील’ असल्याचे सांगून लाखो रुपयांना गंडा घातला आहे.

गौरी वांजळे हिने पुरुषांवर केलेल्या अत्याचाराच्या घटना अत्यंत गंभीर आहेत. तिने अनेकांना आपले लक्ष्य बनवून त्यांना गुंगीचे औषध मिसळलेले पेय पाजले आणि त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार केले.एका विवाहित व्यक्तीला तिने आधी जबरदस्तीने जवळीक साधायला लावली, त्याचे खासगी फोटो काढले आणि नंतर ब्लॅकमेल केले. हा प्रकार इथेच थांबला नाही; त्यानंतर तिने त्या व्यक्तीच्या अंगावर ॲसिड देखील फेकले. एवढे सगळे होऊनही तिने त्या व्यक्तीशी लग्न करून त्याला धमक्या देणं सुरूच ठेवले.

आणखी वाचा   डेक्कन परिसरात महापालिकेचा धडक मोर्चा : पाच ट्रकभर साहित्य जप्त, पदपथ मोकळे