माजी उपमहापौर आबा बागुल यांचा शिवसेनेत प्रवेश

पुणे :

शहरातील कांग्रेस चे ज्येष्ठ राजकीय नेते व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुंबई येथे पार पडलेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात शिंदे यांनी बागुल यांचे शिवसेनेत स्वागत केले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बागुल यांच्या राजकीय अनुभवाचे कौतुक करत, त्यांच्या प्रवेशामुळे पुण्यातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढेल, असा विश्वास व्यक्त केला. शिवसेना सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असून, अनुभवी नेतृत्वाची पक्षाला नेहमीच गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

आणखी वाचा   डेक्कन परिसरात महापालिकेचा धडक मोर्चा : पाच ट्रकभर साहित्य जप्त, पदपथ मोकळे