मंडई मेट्रो स्टेशनला महात्मा फुलेंचे नाव; माळी महासंघाचा ढोल-ताशांत जल्लोष

पुणे:

मंडई मेट्रो स्टेशनचा नामविस्तार करून त्याला ‘महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन’ असे नाव देण्यात आल्याबद्दल माळी महासंघातर्फे आज जल्लोषात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात नृत्य, फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे भरवत हा आनंद व्यक्त करण्यात आला. गोटीराम भैय्या चौक येथील महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन परिसरात हा कार्यक्रम पार पडला.

या वेळी माजी आमदार कमल ढोले-पाटील, माळी महासंघ पुणे शहरचे अध्यक्ष दीपक जगताप, प्रदेश महिला अध्यक्ष गायत्री लडकत, पुणे शहर अध्यक्ष स्मिता लडकत, उपाध्यक्ष बाळासाहेब लडकत, सचिव गिरीष झगडे यांच्यासह रिमा लडकत, यशोधन आखाडे, सारंग राऊत, नाना कुदळे, रवि सहाने, प्रिती म्हेत्रे, प्रज्वल बनकर, गणेश वाडकर, मारुती भुजबळ, अजय टिळेकर, दुर्गेश नवले, मधुकर राऊत, शशिकला ढोले-पाटील, चांगदेव पिंगळे, काळुराम अण्णा गायकवाड, हिरामन भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

आणखी वाचा   म्हाडाच्या घरांसाठी विक्रमी अर्ज; सोडतीची तारीख लवकरच जाहीर