त्यांच्या आयुष्यात आली मांगल्याची पहाट

पुणे-

रागाच्या भरात  अजाणते पणे झालेल्या चुकीमुळे त्यांना  तारुण्यात कारागृहात जावे लागले. जीवनातील ऐन उमेदीचा काळ हा कारागृहातील नकारात्मक वातावरणात गेला . आजूबाजूला सगळे गुन्हेगार ,नकारात्मक वातावरण . पण या वातावरणात राहून सुद्धा त्यांनी कारागृहातील वेळ चित्रकला शिकण्यात घालवला. अर्थात यासाठी त्यांना मदत मिळाली ती कारागृह प्रशासनातील अधिकाऱ्यांची. कॅनव्हास, रंग, ब्रश  यांनीच त्यांची जन्मठेपे मध्ये साथ केली .
चित्रकला आणि लेखन या दोन कला आत मध्ये राहून बहरल्या. त्यांची  जन्मठेप काही प्रमाणात सुसह्य झाली आणि बाहेर आल्यानंतर त्यांची कलाच त्यांच्या उज्वल भवितव्याची साधन बनली.

अनिल आणि सुनील  (नाव बदलले आहे )या दोघांची मैत्री कारागृहात झाली. अनिल चित्र काढतो आणि सुनील त्याच चित्रावर  लेख लिहितो. कारागृहातून शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर जर त्यांच्या हाताला काम मिळाले नाही , प्रेम मिळाले नाही तर हे कैदी पुन्हा गुन्हेगारीकडे जातात. असे होऊ नये म्हणून गेली अनेक वर्ष पुण्यातील भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र कारागृह प्रशासनाच्या सहकार्याने *प्रेरणापथ* हा प्रकल्प सुरू आहे.

त्यांच्या या नवीन आयुष्याचा शुभारंभ करण्यासाठी महाराष्ट्राच्या नगरविकास ,परिवहन, सामाजिक न्याय राज्य मंत्री माधुरीताई मिसाळ ,महाराष्ट्र कारागृह प्रशासन अपर पोलीस महासंचालक  सुहास वारके, रामभाऊ  म्हाळगी  प्रबोधिनीचे उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे, विशेष पोलीस महानिरीक्षक सी आय डी, सुधीर हिरेमठ,विशेष कारागृह निरीक्षक श्री योगेश देसाई, अपर पोलीस आयुक्त संजय पाटील, विशेष पोलीस उप महानिरीक्षक श्री प्रवीण पाटील, ज्येष्ठ विचारवंत कृष्णन श्रीनिवासन, पुणे बार
असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत झंजाड, विशेष पोलीस उप महानिरीक्षक ( निवृत्त) चंद्रशेखर दैठणकर, येरवडा कारागृह अधीक्षक श्री सुनील ढमाळ, येरवडा खुले कारागृह अधीक्षक श्री शामकांत शेडगे,  चित्रकार गिरीश चरवड,  शिल्पकार विवेक खटावकर, ज्येष्ठ विधीज्ञ  प्रताप परदेशी आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

आणखी वाचा   पुणे जिल्हा परिषदेच्‍या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर आता सभापतीपदासाठी मोर्चेबांधणी; मिलिंद वाळंज यांचे नाव आघाडीवर