पुणे :




टीईटी अनिवार्यता आणि संच मान्यतेच्या सरकारी आदेशांविरोधात राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर समन्वय संघटनांच्या वतीने आज, शुक्रवार, ५ डिसेंबर रोजी ‘शाळा बंद’ आंदोलन पुकारण्यात आले आहे. सन २०२४ चे संच मान्यता धोरण रद्द करण्याची मागणी आणि टीईटी परीक्षेमुळे निर्माण झालेल्या संभ्रमाकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी अनुदानित सुमारे ८० हजार शाळा आज बंद ठेवण्याचे आवाहन शिक्षक संघटनांनी केले आहे.
राज्यात विविध ठिकाणी शिक्षण विभागाच्या कार्यालयात शिक्षक निवेदन देणार आहेत, असे शिक्षक सेनेचे कार्याध्यक्ष जालिंदर सरोदे यांनी सांगितले. तर, प्राथमिक शिक्षक संघाचे संभाजीराव थोरात म्हणाले की, संच मान्यता निकषांनुसार राज्यातील हजारो शाळांमध्ये केवळ एक किंवा दोनच शिक्षक नियुक्त केले जातील, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

















