पेशवे पार्कच्या शिवसृष्टीवरुन शिवसेनेचा भाजपविरोधी निषेध

पुणे-

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अपमान करीत भाजप व पुणे महानगरपालिकेच्या प्रशासकीय सुस्तगतीवर शिवसेनेने आज पेशवे पार्क येथे तीव्र निदर्शन केले.

पुणे महानगरपालिकेच्या १२ हजार कोटींच्या बजेटमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली पेशवे पार्कमधील शिवसृष्टी आज धुळखात पडलेली आहे. प्रभागात भाजपचे पाच नगरसेवक असूनही ही दुरवस्था म्हणजे शिवविचारांबाबत भाजपची उदासीनता व शिवद्रोही मानसिकतेचे स्पष्ट प्रतीक आहे, असे शिवसेनेचे मत आहे.

शिवसेनेच्या निदर्शनात उपस्थितांनी “शिवद्रोही भाजपचा निषेध असो”, “शिवसृष्टीचा अपमान सहन करणार नाही”, “प्रशासनाची दिरंगाई बंद करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

शहरप्रमुख संजय मोरे, गटनेते अशोक हरणावळ, उपशहरप्रमुख भारत कुंभारकर, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, तसेच दिलीप पोमन, मुकुंद चव्हाण, राजू चव्हाण, गोविंद निंबाळकर, गणेश घोलप, रणजीत शिंदे, संदीप गायकवाड, संजय साळवी, सुरज लोखंडे, रमेश परदेशी, गजानन देशमुख, चंदन बेंडवाल, निलेश वाघमारे, राहुल शेडगे, संजय वाल्हेकर, ज्ञानेश्वर पोळ, गणेश पोकळ, निलेश आल्हाट, पुरुषोत्तम विटेकर, अमित पापल, जगदीश दिघे, नागेश खडके, राजेश शेलार, अमर मारतकर, सूरज खंडाळे, सनी गायकवाड, सोमनाथ खांगटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आणखी वाचा   पुणे महापालिकेत भाजपचे महिला कार्ड जोरात,  उमेदवारी यादीतून लाडक्या बहिणींला पाठबळ स्पष्ट