पुणे महापालिका निवडणुकीपूर्वी प्रकल्पांचा धडाका

पुणे :

पुणे महापालिकेची निवडणूक लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने आता प्रशासन आणि राजकीय पक्षांची तयारी जोरात सुरु झाली आहे. आचारसंहिता लागू होण्याआधी महापालिकेच्या सुमारे १२४९ कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होण्याची शक्यता आहे. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी यासंदर्भात बैठका घेऊन कामांचा आढावा घेतला आहे.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना व आरक्षित प्रभाग अंतिम झाले असून, पुढील दोन आठवड्यांत मतदार यादीसुद्धा अंतिम होईल. पूर्वी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांनंतर महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता होती; मात्र आता महापालिकेच्या निवडणुका आधी होऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे. आचारसंहिता डिसेंबरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जाहीर होऊ शकते, असा अंदाज राजकीय व प्रशासकीय पदाधिकाऱ्यांमध्ये व्यक्त केला जात आहे.

आणखी वाचा   सांडपाणी वाहिनीच्या कामाचा बहाणा; ज्येष्ठ नागरिकाला पावणेसात कोटींना गंडा