महापालिकेत स्थायी समिती अध्यक्षपदासाठी निवडणुकीचा मोहिमेला सुरूवात

पुणे :

पुणे महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षपदासाठी निवडणूक २३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. महापालिकेच्या नगरसचिव योगिता भोसले यांनी याबाबत माहिती दिली.
स्थायी समितीसह महापालिकेत एकूण सात विषय समित्या अस्तित्वात असून, या समित्यांवरील सदस्य नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता अध्यक्षांची निवड बाकी आहे. सुरुवातीला स्थायी समिती अध्यक्षाची निवड केली जाईल आणि नंतर इतर समित्यांच्या अध्यक्षांची निवड प्रक्रिया होईल.
अध्यक्षपदासाठी इच्छुक नगरसेवकांचे अर्ज १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत महापालिकेत स्वीकारले जाणार आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी विभागीय आयुक्तांना पत्र देण्यात आले असून, त्यानुसार निवडणूक सोमवार, २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:३० वाजता घेण्याचे ठरले आहे.
स्थायी समितीमध्ये एकूण १६ सदस्य असून, त्यापैकी १२ सदस्य भाजपचे असल्याने अध्यक्षपद भाजपकडे जाण्याची शक्यता स्पष्ट आहे. पक्षाकडून रुपाली धाडवे, कालिंदा पुंडे, जयश्री भूमकर, विशाल धनवडे, रत्नमाला सातव, प्राची आल्हाट, श्रीनाथ भिमाले, मयूरी कोकाटे, डॉ. दादा कोद्रे, वृषाली कामठे, निशा मानवतकर आणि संदीप बेलदरे यांची नामनिर्देश केलेली आहे.
यापैकी श्रीनाथ भिमाले, ज्येष्ठ नगरसेवक, अध्यक्षपदासाठी प्रमुख उमेदवार असल्याने निवडणूक बहुधा बिनविरोध होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने महापौरपदासाठी बिनविरोध निवड होण्याची विनंती केली होती.
निवडणूक झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेत पार पडणार आहे.

आणखी वाचा   चार सदस्यीय प्रभागात मतदारांना दिलासा