गुंड गजा मारणेची पत्नी अजीत पवारांच्या भेटीला

पुणे:

शहरात अलीकडे घडलेल्या गुन्हेगारी घटनांनंतर पुणे पोलिसांनी राबवलेल्या आक्रमक कारवाईमुळे गुन्हेगारी टोळ्यांवर मोठा आळा बसला आहे. मात्र या कारवाईनंतर आता शहरातील राजकारणात नव्या घडामोडी घडताना दिसत असून, गुन्हेगारी पार्श्वभूमीशी संबंधित काही व्यक्ती राजकीय प्रवाहात सक्रिय होण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

या पार्श्वभूमीवर माजी नगरसेविका जयश्री मारणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घेतलेली भेट शहराच्या राजकीय वर्तुळात विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. बारामती येथील शासकीय विश्रामगृहात ही भेट झाल्याची माहिती असून, तिचा नेमका अजेंडा अधिकृतरीत्या जाहीर झालेला नाही. मात्र आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे महत्त्वपूर्ण राजकीय संकेत म्हणून पाहिले जात आहे.जयश्री मारणे या यापूर्वी पुणे महापालिकेच्या नगरसेविका राहिल्या असून, २०१२ साली त्यांनी कोथरूड मतदारसंघातून महापालिका निवडणूक लढवली होती. त्या वेळी मनसेच्या तिकिटावर त्या विजयी झाल्या होत्या.

आणखी वाचा   महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज