आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपतर्फे वचननामा तयार केली जाणार

पुणे:

महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे शहर कोअर कमिटीची बैठक आज केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपतर्फे वचननामा तयार केला जात आहे.त्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन पुण्याच्या पुढील 25 ते 50 वर्षांतील विकास आणि भविष्याबाबत पुणेकरांच काय मत आहे? हे जाणून घेतील. याच माहितीच्या आधारे हा वचननामा तयार केला जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. तर आगामी महापालिका निवडणूक ही मोहोळ यांच्या नेतृत्वात लढणार असल्याची घोषणा कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.लवकरच महापालिका निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीसाठीच्या पुणे शहर कोअर कमिटीची बैठक रविवारी मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, पश्चिम महाराष्ट्राचे संघटन मंत्री मकरंद देशपांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, ज्येष्ठ नेते दिलीप कांबळे, खासदार मेधा कुलकर्णी, निवडणूक प्रमुख गणेश बिडकर, आमदार भिमराव तापकीर, आमदार सुनिल कांबळे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार योगेश टिळेकर, श्रीनाथ भिमाले यांच्यासह विस्तारित कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

आणखी वाचा   मुंढव्यातील शासकीय जमीन प्रकरणात मोठी कारवाई