- पृथ्वीराज सुतार, संजय भोसलेंचा भाजपमध्ये प्रवेश
पुणे :




भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुतीचा हिंदुत्ववादी विचार जपतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विकसित भारताचे स्वप्न आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विकसित महाराष्ट्राचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी पक्षात प्रवेश करणाऱ्या समर्पित कार्यकर्त्यांचे स्वागत आहे. भाजपमध्ये तुम्हाला कधीही सावत्र भावाकडे गेल्याचा अनुभव येणार नाही, तर सख्ख्या भावासारखी सन्मानाची वागणूक मिळेल,’ अशा शब्दांत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार, संजय भोसले आणि अश्विनी भोसले यांचे स्वागत केले.

















