स्कूलबस किंवा खासगी प्रवासी बसने सहल घेऊन जाणा-या खासगी वाहनांवर कारवाई करा

पुणे :

शिक्षण विभागाच्या अटी आणि शर्तींचे पालन न करता स्कूलबस किंवा खासगी प्रवासी बसने सहल घेऊन जाणा-या खासगी वाहनांवर कारवाई करावी आणि केलेल्या कारवाईचा वस्तुस्थितीदर्शक स्वयंस्पष्ट अहवाल द्यावा, असे स्पष्ट आदेश राज्याचे सहाय्यक परिवहन आयुक्त विजय तिराणकर यांनी राज्यातील सर्व प्रादेशिक तसेच उपप्रादेशिक अधिका-यांना दिले आहेत.त्यामुळे यापुढे शाळांच्या सहली आता सरकारी बसने अर्थात लालपरी घेऊनच कराव्या लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सहल म्हणजे खरे तर शालेय जीवनात हसतखेळत नव्या गोष्टींचे ज्ञान मिळवणे, नव्या ठिकाणांना भेटी देणे आणि यामाध्यमातून विद्यार्थ्यांना नविन काहीतरी शिकण्याची संधी मिळवून देणे हा उद्देश असणे गरजेचे आहे. परंतु शाळांच्या सहलींसाठी बहुतांश वेळा वॉटर पार्क, रिसॉट्‌‍र्स, बागबगिचे आदींना प्राधान्य दिले जायचे. यामध्ये बदल करण्यात येऊन शाळांच्या सहली आता ऐतिहासिक स्थळांकडे नेण्याचे आदेश शिक्षण विभागाने काढले आहेत. विद्यार्थ्यांना ऐतिहासिक विषयाचे ज्ञान मिळण्याबरोबरच सांस्कृतिक, भौगोलिक, शैक्षणिक गोष्टी अनुभवण्यासाठी ऐतिहासिक स्थळी सहली नेण्यात येणार आहेत.

आणखी वाचा   नगरसेवक सनी निम्हण यांच्या प्रयत्नातून औंध–डेक्कन बससेवा पुन्हा सुरू