म्हाडाच्या घरांसाठी विक्रमी अर्ज; सोडतीची तारीख लवकरच जाहीर

पुणे:

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) विविध गृहनिर्माण योजनांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. एकूण 4,168 घरांसाठी तब्बल 2 लाख 15 हजार 847 अर्ज दाखल झाले असून, ही संख्या आतापर्यंतची विक्रमी असल्याचे प्रमुख अधिकारी राहुल साकोरे यांनी सांगितले.

मूळ सोडत 11 डिसेंबरला जाहीर करण्याचा कार्यक्रम होता. परंतु अर्जांचे प्रमाण अपेक्षेपेक्षा दुपटीहून अधिक असल्याने तपासणीसाठी अधिक वेळ लागणार आहे. त्यामुळे सोडतीची सुधारित तारीख लवकरच कळवली जाईल, असेही साकोरे यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा   पुणे महापालिकेत ‘घराणेशाही’चा ठसा कायम