पाषाण मेन रोड परिसरात दिसला बिबट्या

पुणे –
काल रात्री १२.३० वाजता हॉटेल डी पॅलेस, ते लेनटना गार्डन एन.डी.ए. – पाषाण मेन रोड परिसरात बिबट्या पाहण्यात आला आहे. नागरिकांनी अनावश्यकपणे रात्री उशिरा बाहेर पडणे टाळावे, लहान मुले व पाळीव प्राण्यांना घराबाहेर एकटे सोडू नये आणि परिसरात हालचाल करताना सतर्क राहावे. बिबट्या आढळल्यास त्वरित वनविभाग किंवा पोलीस प्रशासनास माहिती द्यावी. आपली सुरक्षितता सर्वात महत्त्वाची सावध रहा, सुरक्षित राहा. असे आवाहन माजी नगरसेवक
दिलीप वेडेपाटील यांनी केले आहे.

आणखी वाचा   गुडलक चौकातील ‘कलाकार कट्टा’ जतन करावा– राष्ट्रवादीची महापालिकेला मागणी