5 वी खेलो इंडिया विद्यापीठ स्‍पर्धा, राजस्‍थान २०२५

खेलो इंडिया १०० मीटर शर्यतीत महाराष्ट्राची हुकुमत, गायत्री, रिंकीला रौप्‍य

पुणे:

खेलो इंडिया विद्यापीठ स्‍पर्धेत महाराष्ट्राची विजयी घोडदौड ॲथलेटिक्‍स ट्रॅकवरही झळकली. लक्षवेधी १०० मीटर धावणे शर्यतीत सुवर्ण,रौप्यसह कांस्य पदकावर महाराष्ट्राच्‍या खेळाडूंनी नाव कोरले. २० मीटर चालणे शर्यतीत गायत्री  चौधरीने तर ५००० मीटर धावणे शर्यतीत आदिवासी पाड्यावरील  रिंकी पवाराने रूपेरी धाव घेत दिवस गाजविला.

सवाई मानसिंग क्रीडा संकुलातील ॲथलेटिक्‍स ट्रॅकवर वेगवान धावपटू होण्याचा मान शिवाजी विद्यापीठाच्‍या ऋषी प्रताप देसाईने संपादन केला. 10.53 सेकंदाची वेळ नोंदवून कोल्‍हापूरच्‍या ऋषीने बाजी मारली. 

आणखी वाचा   प्रशांत जगताप यांचा आज काँग्रेस प्रवेश निश्चित