पुणे:




पुण्यात वैवाहिक आयुष्यातील मतभेदातून संतापाची परिसीमा गाठणारी एक गंभीर घटना उघडकीस आली आहे. शरीरसंबंधाची मागणी केल्यावर पतीनेच पत्नीवर अत्याचार करत तिच्या गुप्तांगावर तसेच मांडीवर सिगारेटचे चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला.या प्रकरणी पीडितेने येरवडा पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.तक्रारदार 29 वर्षीय महिलेचा विवाह 11 एप्रिल 2025 रोजी येरवड्यातील 33 वर्षीय पुरुषाशी मुस्लिम पद्धतीने झाला. लग्नानंतरच्या पहिल्याच रात्रीपासून पतीचा व्यवहार संशयास्पद होता. हनिमून नाइटला तो “खूप थकलो आहे” असे सांगत झोपी गेला. पुढील काही दिवस पत्नीने पती नैसर्गिकरित्या पुढाकार घेईल, अशी अपेक्षा ठेवून वाट पाहिली. मात्र, पती तिच्यासोबत झोपला तरी शारीरिक नातेसंबंध ठेवण्यापासून तो सातत्याने दूर पळत होता.
















