महापालिका निवडणुकीनंतर पुण्याचा महापौर हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचाच असणार

– खा. सुप्रिया सुले

पुणे :

राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनाम्यात केलेल्या घोषणेची पूर्तता आम्ही करणार आहोत. त्याचा अतिरिक्त बोजा पुणेकरांवर पडणार नाही, याची आम्ही काळजी घेणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील व पुण्यातील गुन्हेगारी संपवतील, अशी अपेक्षा होती.

आजही कोयता गँग किंवा पुण्यातील गुन्हेगारी संपलेली नाही. पुण्यासह महाराष्ट्रातील गुन्हेगारी वाढली आहे, हे मी नव्हे तर केंद्र सरकारचा डेटा सांगतो, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष, खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

खासदार सुप्रिया सुळे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त लाल महाल येथील राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला त्यांनी सुरुवात केली. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “भाजपने लोकसभेला ४०० पारचा नारा दिला होता, जे झाले ते आपल्या सगळ्यांच्या डोळ्यांसमोर आहे. त्यामुळे आता भाजपच्या ११० जागा निश्चित आहे, यावर माझा विश्वास नाही. जर त्या जागा फिक्स असतील, तर त्या कशा पद्धतीने फिक्स केल्या आहेत, हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या किती जागा निवडून येतील मला माहीत नाही. मी नंबरवर विश्वास ठेवत नाही. पण, महापालिका निवडणुकीनंतर पुण्याचा महापौर हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचाच असणार आहे.

आणखी वाचा   सातबारा ‘दुरुस्ती’च्या आड मोठा घोटाळा