सनसिटी–कर्वेनगर जोडणारा नवा पूल एप्रिलअखेर खुला होणार

पुणे :

नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता) तसेच पुणे–बंगळूर महामार्गावरील वाढत्या वाहतुकीच्या ताणाला पर्याय ठरणारा सनसिटी ते कर्वेनगर दरम्यानचा नवा पूल अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. एप्रिलअखेरपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट असून, त्यासाठी विशेष प्रकल्प विभागाने कामाला वेग दिला आहे. मुठा नदीवर उभारण्यात येणारा हा पूल सिंहगड रस्ता, कोथरूड, कर्वेनगर तसेच सातारा रस्ता–कात्रज परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. सध्या या भागातील वाहनचालकांना वारजे पुलावरील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. सकाळी व सायंकाळी महामार्गावर होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे प्रवासाचा वेळ दुपटीने वाढतो. नव्या पुलामुळे हा ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. मे २०२३ मध्ये या प्रकल्पासाठी कार्यादेश देण्यात आला होता.

आणखी वाचा   नियमभंगामुळे रखडलेल्या स्थानिक निवडणुका अखेर मार्गी