अखेर दोन राष्ट्रवादी एकत्र

पुणे:

महापालिकेत भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुण्यात एकत्र लढण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी ही माहिती दिली. मात्र, या बैठकीत जागा वाटप तसेच कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे काकडे यांनी स्पष्ट केले.

बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसकडून शहराध्यक्ष सुनील टिंगरे आणि सुभाष जगताप उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी खासदार वंदना चव्हाण, माजी स्थायी समिती अध्यक्ष विशात तांबे तसेच अंकुश काकडे उपस्थित होते. 

आणखी वाचा   पालखी सोहळ्यापूर्वी विश्रांतवाडी उड्डाणपूल पूर्ण होणार का? कामाच्या संथगतीमुळे नागरिकांमध्ये चिंता