संघटनेतील सातत्यपूर्ण कामावर पक्षाने विश्वास दाखवला ; बाप्पु मानकर यांची भावना

पुणे :

गेल्या ९ वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या संघटनेत पदाधिकारी आणि प्रभागात, पूर्णवेळ ‘कार्यकर्ता’ म्हणून केलेल्या कामाचा पक्षाने विचार केला आणि मला संधी पक्षाने दिल्याची प्रतिक्रिया, भाजपाचे शहर सरचिटणीस  राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी उमेदवारी जाहीर झाल्यावर दिली. पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक २५ (शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई) मधून राघवेंद्र बाप्पु मानकर यांना संधी देण्यात आली आहे.

‘पक्षसंघटनेत काम करत असताना भारतीय जनता युवा मोर्चाचा शहराध्यक्ष म्हणून युवा कार्यकर्त्यांच्या सोबतीने केलेले संघटन, विविध कार्यक्रमांच्या नियोजनाची जबाबदारी आणि त्याच वेळी प्रभागातील नागरिकांशी सातत्यपुर्ण संपर्क या माझ्या कामांमुळे पक्षातील सर्व वरिष्ठांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे. त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद मानतो. या विश्वासाला सार्थ ठरवत बूथ प्रमुख ते केंद्रिय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ, नामदार चंद्रकांत दादा पाटील, कसब्याचे आमदार हेमंतभाऊ रासने, शहराध्यक्ष धीरजजी घाटे यांच्यासह पक्ष संघटनेतील सर्व वरिष्ठांच्या व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने या प्रभागातून मोठा विजय पक्षाला मिळवून देणार असल्याचे’, बाप्पु मानकर यांनी सांगितले.

*२४ तास जनसंपर्क कार्यालय

पक्ष संघटनेत काम करत असताना बाप्पु मानकर यांनी स्थानिक पातळीवर जनसंपर्क तुटू दिला नाही. २०१६ साली बाप्पु मानकर यांनी प्रभागात २४ तास सुरू असलेले जनसंपर्क कार्यालय सुरू केले. ज्येष्ठ नागरिक व प्रभागातील नागरिकांना कोणत्याही वेळी मदतीसाठी उपलब्धता राहावी यासाठी हे कार्यालय सुरु केल्याचे मानकर यांनी  सांगितले. या कार्यालयाच्या माध्यमातून सहा हजारांहून नागरिकांची कामे मार्गी लागल्याची चर्चा या प्रभागात होत असते.

आणखी वाचा   पुण्यात काँग्रेस–भाजप आंदोलनानंतर  पोलिसांकडून कडक कारवाई