शस्त्रक्रियेत निष्काळजीपणा हृदयरोगतज्ज्ञावर गुन्हा दाखल

पुणे –

हृदयशस्त्रक्रियेत निष्काळजीपणा केल्याच्या आरोपावरून एका प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञासह त्यांच्या साथीदारांवर वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत विजय मधुकर जायभाये (वय ४४, रा.चिंचोली चौक, बुलडाणा) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डाॅ. रणजित जगताप यांच्यासह सहकाऱ्यांविरुद्ध शस्त्रक्रियेत निष्काळजीपणाचा ठपका ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा   जुबैरचे थेट संबंध आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्कशी