भाजपमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांचा प्रश्न; माजी नगरसेवकांना प्राधान्य, कार्यकर्त्यांची नाराजी

पुणे –

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये पक्षकार्यकर्त्यांचा प्रश्न उभा राहिला आहे. पक्षासाठी वर्षानुवर्षे झटणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना योग्य सन्मान न मिळाल्याची भावना सोशल मीडियावर प्रकट झाली आहे.

भाजप पुण्यात महापालिकेत १२० जागा जिंकण्याचे उद्दीष्ट ठेवले असून, त्यासाठी इतर पक्षांतील माजी नगरसेवकांना पक्षात सामील करण्याची तयारी सुरू आहे. मात्र, यामुळे वर्षानुवर्षे कार्यकर्त्यांसोबत पक्षासाठी झटणाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. अनेक कार्यकर्ते पक्षाबाहेरील उमेदवारांना अधिक संधी मिळत असल्याचे भासत आहे, ज्यामुळे बंडखोरीच्या चिन्हांनाही सुरुवात झाली आहे.

आणखी वाचा   वाहतूक नियमभंगावर मोठी कारवाई