पीएमपीएमएलमध्ये तोंडात तंबाखू ठेवून वाहन चालविणारे चालक ‘रडार’वर; नियमभंग करणाऱ्यांवर हजार रुपयांचा दंड

पुणे :

पीएमपीएमएलच्या बसमध्ये प्रवास करताना अनेक चालक तोंडात गुटखा, पान किंवा तंबाखू ठेवून वाहन चालवितात तसेच रस्त्यावर थुंकतात, अशा तक्रारी सातत्याने येत होत्या. प्रवाशांना होणारा त्रास, रस्त्यांवरील अस्वच्छता आणि संस्थेची प्रतिमा मलिन होणे याचा विचार करून पीएमपीएमएल प्रशासनाने आता कठोर पावले उचलली आहेत.

कठोर नियमांची अंमलबजावणी सुरू

पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी चालकांसाठी कठोर नियम लागू केले आहेत. ड्युटीदरम्यान तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकताना चालक आढळल्यास त्वरित कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नियमभंगास एक हजार रुपयांचा दंड

अशा प्रकारात दोषी आढळणाऱ्या चालकावर एक हजार रुपयांचा दंड आकारला जाणार असून हा दंड वसूल करणे अनिवार्य असेल. तंबाखू सेवन आणि थुंकण्याच्या कृतीमुळे प्रवाशांच्या नजरेत संस्थेची बदनामी होत असल्याचे देवरे यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा   लोकशाही वाचवण्यासाठी पुणेकरांनी पुढे यावे- माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आवाहन