पुणे–अबू धाबी थेट उड्डाणसेवेची एअर इंडिया एक्स्प्रेसकडून सुरूवात

पुणे:

एअर इंडिया एक्स्प्रेसतर्फे मंगळवार पासून पुणे–अबू धाबी या थेट उड्डाणसेवेची सुरूवात करण्यात आली. पुणे विमानतळावरून अबू धाबीसाठी प्रथमच थेट विमानसेवा उपलब्ध झाली असून, दुबई आणि बँकॉकनंतर हे तिसरे आंतरराष्ट्रीय डेस्टिनेशन पुणेकरांसाठी खुले झाले आहे.

या सेवेच्या प्रारंभामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी नवी सुविधा उपलब्ध झाली असून व्यावसायिक, उद्योजक, विद्यार्थी तसेच मध्यपूर्वेत कार्यरत असलेल्या हजारो कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आणखी वाचा   अल्प विस्तार, मोठा दिलासा; पीएमपीएमएल बस सेवा थेट खडकी जंक्शनपर्यंत