हातात कमळ, विकासाचं व्हिजन’ 

* लहू बालवडकरांच्या प्रचाराला प्रभाग ९ मध्ये उस्फूर्त प्रतिसाद

पुणे :

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांनी शहराच्या राजकारणात पुन्हा एकदा उकळी आणली असताना, प्रभाग क्रमांक ९ मध्ये भाजपचा प्रचार निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. सूस गावात काढण्यात आलेल्या भव्य पदयात्रेने ही लढत केवळ औपचारिक न राहता जनतेचा कौल कुणाच्या बाजूने झुकतोय, याची स्पष्ट झलक दिली.

प्रभाग क्रमांक ९ मधील भाजपचे अधिकृत उमेदवार लहू बालवडकर, रोहिणी चिमटे, गणेश कळमकर आणि मयुरी कोकाटे यांना मिळालेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा केवळ पक्षीय पाठिंबा नसून, तो “विकासाच्या दिशेने मत” असल्याचे चित्र या पदयात्रेतून स्पष्ट झाले.

विशेषतः लहू बालवडकर हे या प्रचाराचे केंद्रबिंदू ठरत आहेत.

“हातात कमळ, विकासाचं व्हिजन” हा नारा प्रत्यक्ष रस्त्यावर उतरलेला दिसत असून, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, सूस आणि परिसरातील नागरिकांकडून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.

टीका नाही, फक्त विकासाची भाषा

राजकीय वातावरणात आरोप–प्रत्यारोपांचे राजकारण रंगलेले असताना, लहू बालवडकर यांनी पूर्णपणे वेगळी भूमिका घेतली आहे.

आणखी वाचा   गुंड गजा मारणेची पत्नी अजीत पवारांच्या भेटीला