निवडणूक काळातही अविरत स्वच्छता

पुणे –

स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा मोहिमेला बळ म्हणून, आमदार हेमंतभाऊ रासने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग २५ शनिवार पेठ महात्मा फुले मंडई भागात सुरू असलेले ‘मिशन स्वच्छ प्रभाग २५’ अविरतपणे सुरू असल्याची माहिती राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी दिली.

प्रभागातील स्वच्छतेविषयक गरज लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेले ‘मिशन स्वच्छ प्रभाग २५’ चा बाप्पु मानकर यांनी प्रचाराच्या धामधुमीतही नियमित अढावा घेतला. नागरिकांकडून प्राप्त होत असलेल्या अस्वच्छतेविषयक तक्रारी त्यांचे निराकरण, लागणारा वेळ याबाबत त्यांनी माहिती घेतली. तसेच स्वच्छता सेवकांच्या आरोग्याची विचारपूस केली. निवडणुकीची घोषणा झाल्यावरही निवडणूक आयोगाच्या नियमांच्या अधीन राहून हे अभियान सुरू ठेवण्यात आले आहे.

आणखी वाचा   पुणे महापालिकेत ‘घराणेशाही’चा ठसा कायम