बालेवाडीमध्ये इनडोअर नाट्यगृह, फुटपाथ दुरुस्ती आणि अतिक्रमणाविरुद्ध महापौरांकडे निवेदन

पुणे :

बाणेर–बालेवाडी–म्हाळुंगे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षितता आणि सांस्कृतिक विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. बालेवाडी सर्व्हे क्र. १४, हिस्सा क्र. १ ते ८, १० ते १२ आणि १५ या जागेत गेली १२ वर्षे पडून असलेल्या धोकादायक सिमेंट काँक्रीटच्या ढाच्याचे पाडणी करून बालगंधर्व रंगमंदिराच्या पद्धतीवर भव्य इनडोअर नाट्यगृह उभारण्याचे निवेदन भाजप चे माजी सरचिटणीस गणेश कळमकर यांनी महापौर मंजुषा नागपुरे यांच्याकडे सादर करण्यात आले आहे.

सदर जागेत पूर्वी ओपन एअर ऑडिटोरियमसाठी आरसीसी खांब उभारले होते, पण ते ढांचे गेल्या अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्वरित पाडणी करणे आवश्यक असल्याचे निवेदनात ठामपणे नमूद केले गेले आहे.

यासोबतच बाणेर–बालेवाडी–म्हाळुंगे परिसरातील फुटपाथ व रस्त्यांवरील वाढत्या अतिक्रमणांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी तसेच वाहतुकीस सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, असे निवेदनात सुचवण्यात आले आहे.

निवेदनात पुढील फुटपाथ दुरुस्ती कामांवर लक्ष देण्याची विनंती केली आहे:

बाणेर – हॉटेल ग्रीन पार्क ते कै. बाबुराव हबाजी सायकर (गणराज) चौक

बालेवाडी फाटा – गणपती मंदिर ते ताम्हाणे चौक ते मेडीपॉइंट हॉस्पिटल

बालेवाडी गावठाण ते बालेवाडी फाटा – गणपती मंदिर

कै. बाबुराव हबाजी सायकर (गणराज) चौक, बाणेर ते ममता चौक, बालेवाडी

दत्त मंदिर, बाणेर ते बिटवाईज चौक – मुंबई-बेंगलोर हायवे

निवेदनानुसार, पादचाऱ्यांसाठी सुरक्षित, समतल आणि सुलभ मार्ग उपलब्ध व्हावेत, तसेच जीर्ण ढाचे पाडून सांस्कृतिक प्रकल्पासाठी जागा सुनिश्चित करावी, अशी मागणी महापौरांकडे करण्यात आली आहे.

आणखी वाचा   पुणे महापालिका निवडणुकीत भाजपचा ‘वंशपरंपरा फॉर्म्युला’