चोरीच्या आरोपाचा धक्का असह्य; फुरसुंगीतील तरुणाची धावत्या रेल्वेखाली आत्महत्या

पुणे :

चोरीचा आरोप करून शिवीगाळ व मारहाण केल्याच्या मानसिक धक्क्याने २२ वर्षीय तरुणाने धावत्या रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना हडपसरमधील फुरसुंगी परिसरात घडली. या प्रकरणी तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाणे येथे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अतुल लक्ष्मण अहिरे (वय २२, रा. पापडे वस्ती, फुरसुंगी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याच्या भावाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल हा खासगी ठिकाणी काम करत होता.
दरम्यान, आरोपींनी त्याच्यावर चोरीचा आरोप करत शिवीगाळ करून मारहाण केली होती. या प्रकारामुळे अतुल मानसिक तणावाखाली होता. अखेर नैराश्याच्या भरात त्याने २५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री पुणे–कोल्हापूर लोहमार्गावर धावत्या रेल्वेखाली उडी मारून जीवन संपविले.
या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

आणखी वाचा   २३ समाविष्ट गावांसाठी दोन हजार कोटींचे कर्ज; पाणी व सांडपाणी प्रकल्पांना गती