जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; आचारसंहिता लागू

पुणे :

राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, त्यानुसार संबंधित जिल्ह्यांत तात्काळ आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी मंगळवार, ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून गुरुवार, ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे.

निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाच्या टप्प्यांनुसार उमेदवारी अर्ज १६ ते २१ जानेवारी या कालावधीत स्वीकारले जाणार आहेत. दाखल झालेल्या अर्जांची छाननी २२ जानेवारी रोजी केली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांना २७ जानेवारीपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत देण्यात आली आहे.

दरम्यान, आचारसंहिता लागू झाल्याने प्रचार, शासकीय योजना, निधीवाटप तसेच प्रशासनिक निर्णयांवर निर्बंध आले असून, निवडणूक पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

आणखी वाचा   सात महिन्यांत ७५ हजार पुणेकरांना उच्च रक्तदाब; महापालिकेच्या तपासणीत धक्कादायक चित्र समोर