भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्थेच्या वतीने सहावा पुणे पर्यटन महोत्सव १६ ते १८ जानेवारीला

– प्रवीण घोरपडे यांची पत्रकार परिषदेत माहिती

पुणे :

महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विकासासाठी भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्थेच्या वतीने आयोजिला जाणारा ‘पुणे पर्यटन महोत्सव’ अर्थात पुणे ट्रॅव्हल फेस्टिवल यंदा १६ ते १८ जानेवारी २०२६ या कालावधीत हॉटेल सेंट्रल पार्क, डेक्कन पुणे येथे होणार आहे. तीनही दिवस हा महोत्सव सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्व पुणेकरांसाठी विनामूल्य खुला राहणार आहे, अशी माहिती भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्थेचे चेअरमन प्रवीण घोरपडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थेचे सचिव प्रथमेश कुलकर्णी, खजिनदार हेमंत जानी, संचालक संतोष माने, सजेश पिल्ले, आशिष हिंगमिरे, अमित कुलकर्णी, चंदन पठारे आदी उपस्थित होते.

प्रवीण घोरपडे म्हणाले, “पुणे पर्यटन महोत्सवाचे यंदा सहावे वर्ष आहे. महोत्सवाचे उद्घाटन येत्या शुक्रवारी (दि. १६) सकाळी १० वाजता प्रसिद्ध गायिका डॉ. राधा मंगेशकर व पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक भरत लांघी यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवात नामांकित ७० पेक्षा अधिक पर्यटन कंपन्या आपले सहलींचे पर्याय सादर करणार आहेत. त्याशिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रम, कॉर्पोरेट ट्रॅव्हल अँड टुरिझम मीट, काश्मीर टुरिझम, महाराष्ट्र टुरिझम, मानसरोवर यात्रा यावर चर्चासत्रे होणार आहेत. ‘एकटीचा सफरनामा’ हे डॉ. राधा मंगेशकर यांचे अनुभवकथन ऐकता येणार आहे.”

आणखी वाचा   कडक पोलिस बंदोबस्तात आंदेकर कुटुंबाचे उमेदवारी अर्ज दाखल