महानगरपालिका निवडणुकीमुळे शहरातील शाळांना सलग चार दिवस सुट्टी

पुणे :

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान, मतमोजणी आणि पूर्वतयारीसाठी शहरातील अनेक शाळा ताब्यात घेतल्या जाणार असल्याने विद्यार्थ्यांना सलग चार दिवसांची सुटी मिळणार आहे. याबाबत शाळा प्रशासनाने पालकांना सूचना देण्यास सुरुवात केली आहे.

निवडणूक प्रशासनाकडून अनेक शाळांमध्ये मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, काही शाळांमध्ये मतमोजणीही होणार आहे. यासाठी निवडणुकीपूर्व तयारी म्हणून प्रशासनाकडून शाळांचा आगाऊ ताबा घेतला जाणार आहे. परिणामी १४ ते १७ जानेवारी या कालावधीत अनेक शाळा बंद राहणार आहेत.

मकरसंक्रांतीनिमित्त १४ जानेवारी रोजी आधीच सुटी असल्याने, १५ जानेवारी रोजी मतदान व १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. बहुतांश शाळांना शनिवार-रविवारची नियमित सुटी असल्याने विद्यार्थ्यांना सलग चार दिवस विश्रांती मिळणार आहे.

“निवडणूकविषयक कामासाठी शाळेचा परिसर वापरात येणार असल्याने १४ ते १७ जानेवारीदरम्यान शाळेला सुटी राहील, अशी माहिती आम्हाला शाळेकडून देण्यात आली आहे,” असे पालक मयुरी काळे यांनी सांगितले.

आणखी वाचा   उच्च जोखीम गर्भवतींसाठी ‘ॲनॉमली स्कॅन’ सक्तीचे