* १५ मार्चला निकाल



पुणे :
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची अधिकृत प्रक्रिया २२ डिसेंबरपासून सुरू झाली असून, निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मुख्य निवडणूक अधिकारी ॲड. प्रताप परदेशी यांनी बुधवारी ही माहिती दिली.
निवडणूक कार्यक्रमानुसार इच्छुक उमेदवारांना ११ ते १६ जानेवारी या कालावधीत कार्यालयीन वेळेत उमेदवारी अर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहेत. १९ ते २२ जानेवारीदरम्यान अर्ज स्वीकारले जातील. प्राप्त अर्जांची छाननी करून २३ जानेवारी रोजी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २५ जानेवारी असून, २७ जानेवारीला अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होईल.
मतदानासाठी पात्र असलेल्या आजीव सभासदांना ५ फेब्रुवारीपासून टपालाद्वारे मतपत्रिका पाठविण्यात येणार आहेत. सभासदांनी आपले मत नोंदवून त्या मतपत्रिका १३ मार्चपर्यंत परत पाठवायच्या आहेत. निवडणुकीचा अंतिम निकाल १५ मार्च रोजी जाहीर केला जाणार आहे.
या निवडणूक प्रक्रियेचे सुचारू नियोजन व अंमलबजावणीसाठी सहायक निवडणूक अधिकारी गिरीश केमकर, संजीव खडके आणि प्रभा सोनवणे यांचे सहकार्य लाभत असल्याचेही ॲड. परदेशी यांनी सांगितले.
















