महाविकास आघाडीच ठरलं

पुणे :

महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत काँग्रेस, ठाकरे शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला प्रत्येकी ५० जागा देण्याचा फाॅर्म्युला ठरला आहे. बाकीच्या पंधरा जागा आघाडीतील अन्य पक्षांना दिल्या जातील.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीत थेट सहभागी होणार नाही. मात्र, शिवसेनेच्या कोट्यातून मनसेला उमेदवारी देण्यावर तिन्ही पक्षांचे एकमत झाले आहे.

वरील सूत्रानंतर आता महाविकास आघाडीत प्रभाग निहाय चर्चा सुरू झाली आहे.महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या. मात्र, राष्ट्रवादीने दिलेल्या कमी जागा आणि घड्याळ निवडणूक चिन्हाचा धरलेला आग्रह यामुळे दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी होणार नसल्याचे स्पष्ट झाले. शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत महाविकास आघाडीतील काँग्रेस, ठाकरे शिवसेना तसेच राशपची बैठक स्टेशन जवळील एका हाॅटेलात पार पडली.

या बैठकीत चर्चेसाठी कमी वेळ असल्याने तिन्ही पक्षांनी कोणाचे किती नगरसेवक आले यावर चर्चा करण्याऐवजी प्रत्येकी ५०-५०-५० जागा लढवाव्यात आणि उर्वरीत १५ जागा आघाडीत येण्यासाठी तयार असलेल्या समविचारी पक्षांना द्याव्यात, असा फाॅर्म्युला निश्चित करण्यात आला. मनसेला आघाडीत प्रवेश देण्याऐवजी शिवसेनेने आपल्या कोट्यातून मनसेला जागा द्याव्या असे ठरविले.

आणखी वाचा   भाजपमधील इच्छुक बंडखोरांना राष्ट्रवादीची कवचकुंडले