पुणे :
वडगाव शेरी प्रभाग पाच मध्ये शिवसेनेने अनेक वर्ष प्रतिनिधत्व केले आहे. या प्रभागात शिवसेना (शिंदे गटाची) ताकद आहे. यामुऴे या प्रभागात किमान दोन जागा शिवसेना शिंदे गटासाठी द्याव्यात अशी मागणी शिवसेना उपशहर संघटक उध्दव गलांडे यांनी पत्रकार परिषदेत केली.



पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप– शिवसेना युती असली, तरी जागावाटपात शिवसेना शिंदे गटाला कमी जागा दिल्या जाणार असल्याच्या चर्चांमुळे पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर वडगाव शेरी मधील शिवसैनिक (शिंदे गट)शिवसेना पुणे शहर उपशहर संघटक उद्धव गलांडे यांच्या संपर्क कार्यालयात आज आयोजित पत्रकार परिषदेत ही मागणी मांडण्यात आली. या पत्रकार परिषदेला छाया रविंद्र गलांडे, रमेश साळुंके, चेतन गलांडे, शाहरुख कुरेशी, विपुल दळवी, विकास गायकवाड आदी मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.

















