नवी मुंबई विमानतळाचा परिणाम, पुणे–मुंबई हेलिकॉप्टरचा मार्ग बदलला

पुणे:

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ २५ डिसेंबरपासून कार्यान्वित होत असल्यामुळे पुणे–मुंबई–पुणे दरम्यान सुरू असलेल्या हेलिकॉप्टर सेवांच्या मार्गात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. या बदलामुळे हेलिकॉप्टर प्रवासाचा कालावधी सुमारे ८ ते १२ मिनिटांनी वाढणार असून २४ डिसेंबरपासून नवा मार्ग लागू होणार आहे.
नवी मुंबई विमानतळावरून सुरू होणाऱ्या वाढत्या विमानवाहतुकीला हेलिकॉप्टर उड्डाणांचा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे. शनिवारी (ता. २०) नव्या हवाई मार्गाला अंतिम मंजुरी देण्यात आली.
सध्याच्या तुलनेत नवा मार्ग काहीसा लांब असल्याने प्रवासाचा कालावधी वाढणार आहे. मात्र या बदलाचा हेलिकॉप्टर प्रवासाच्या भाड्यावर नेमका काय परिणाम होईल, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

कोट-
“नवी मुंबई विमानतळ सुरू होत असल्याने हवाई वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत राहावी, यासाठी हेलिकॉप्टर मार्गात बदल आवश्यक होता,”
— कॅप्टन नितीन वेळदे, पुणे

आणखी वाचा   मुलाची धिंड काढल्याने आई-वडीलांचे टोकाचे पाऊल