शिवसेनेच्या निवडणूक राज्य समन्वयकपदी वैभव वाघ यांची नियुक्ती

* उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्या आदेशाने धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षप्रमुखपदाचीही जबाबदारी 

पुणे :

शिवसेना मुख्यनेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने पुण्यातील युवानेते वैभव वाघ यांची प्रभारी ‘निवडणूक राज्य समन्वयकपदी’ नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षांच्या ‘राज्य कक्ष प्रमुख’ पदाचीही जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे. या दोन्ही नियुक्तीचे पत्र नुकतेच पक्षाचे सचिव संजय मोरे यांच्या हस्ते देण्यात आले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेली ही नियुक्ती महत्वपूर्ण आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे योग्य व्यक्तीला योग्य संधी आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहेत. एकनाथ शिंदे यांनी आपल्या याच स्वभाव वैशिष्ट्याला अनुसरून वंदेमातरम संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष, हाडाचे गणेशोत्सव मंडळ कार्यकर्ते, निवडणूक रणनीतीकार आणि प्रसिद्ध ‘व्हायरल माणुसकी’ ह्या पुस्तकाचे लेखक वैभव वाघ यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.

महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वैभव वाघ यांना पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, पिंपरी-चिंचवड, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी आणि सोलापूर या सहा महानगरपालिकांसाठी समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

आणखी वाचा   गजा मारणे नवीन लुक मध्ये जामीनावर बाहेर....लुकची सर्वत्र चर्चा