३ हजार कोटींच्या विकासकामांचा ‘ऑनलाइन शुभारंभ

पुणे :

शहराच्या विकासाला नवे बळ देणाऱ्या तब्बल ३ हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी पार पडले. गणेश कला क्रीडा मंच येथून ऑनलाइन पद्धतीने हा भव्य कार्यक्रम पार पडला. पायाभूत सुविधा, रस्ते, वाहतूक, पाणीपुरवठा आणि नागरी सोयी-सुविधांशी संबंधित या कामांमुळे पुण्याच्या शहरी विकासाला गती मिळणार आहे.

उद्घाटनानंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकांबाबतही स्पष्ट भूमिका मांडली. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वतंत्रपणे, मात्र मैत्रीपूर्ण लढत लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. “एकत्र लढल्यास विरोधकांना फायदा होऊ नये, हा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे,” असे त्यांनी सांगितले.

राज्यात महानगर पालिका निवडणुकांचा बिगुल वाजताच सत्तासमीकरणं वेगाने घडू लागली आहे. पुण्यात महायुती होणार नसल्याचे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. पुण्यात व पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) हे समोरासमोर असेल, आमच्या एकत्रित आल्याने विरोधकांचा फायदा होऊ नये म्हणून आम्ही मैत्रिपूर्ण निवडणूक लढवणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात विविध विकास कामांच्या उद्घाटणानंतर मध्यमांशी बोलतांना स्पष्ट केले. 

आणखी वाचा   नगरसेवक सनी निम्हण यांच्या प्रयत्नातून औंध–डेक्कन बससेवा पुन्हा सुरू