पुणे महापालिका निवडणूक : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून उमेदवारी अर्ज विक्रीला सुरुवात

पुणे :

महापालिका निवडणुकांची घोषणाबजावणी कधीही होण्याची शक्यता असताना, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून, उमेदवारी अर्ज विक्री प्रक्रियेचीही घाईगडबड सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने पुण्यात उमेदवारी अर्ज विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेनेचे उमेदवारी अर्ज गुरुवार, ४ डिसेंबर २०२५ पासून १० डिसेंबर पर्यंत डेक्कन जिमखाना येथील शिवसेना पुणे शहर कार्यालयात सशुल्क उपलब्ध आहेत. या संदर्भात शहरप्रमुख गजानन थरकुडे आणि संजय मोरे यांनी माहिती दिली.

अर्ज शुल्क व प्रक्रिया :

उमेदवारी अर्जाची किंमत : ₹५००

अर्ज दाखल शुल्क : ₹१०,००० (सर्वांसाठी समान — जात-पात न मानण्याची भूमिका)

अर्ज उपलब्धता वेळ : दुपारी ३ ते सायं. ६

अर्ज विक्रीनंतर सात दिवसांनंतर इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. उमेदवारांचे शैक्षणिक पात्रता, सामाजिक कार्य, पक्षाच्या आंदोलनातील सहभाग, जनसंपर्क, तसेच प्रभागात केलेल्या उपक्रमांचा तपशील अर्जासोबत अपेक्षित आहे. दरम्यान, महाविकास आघाडी किंवा युतीबाबतचा अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असून, त्यानुसार पुणे शहर शिवसेना कामकाज करणार असल्याचेही थरकुडे आणि मोरे यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा   जगतापांच्या राजीनाम्याने राष्ट्रवादी (शरद पवार गट)मध्ये नेतृत्वाचा पेच