पुण्यात विद्यार्थ्याचा क्लासमध्ये मृत्यू; कुटुंबीयांचा आक्रोश

पुणे :

शहरातील जंगली महाराज रोडवरील एका क्लासमध्ये शिकत असताना 16 वर्षीय विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. श्रेयस संतोष शेलार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो अकरावीमध्ये शिक्षण घेत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, क्लासमध्ये शिकवणी सुरू असताना श्रेयसला अचानक चक्कर आली आणि तो खाली कोसळला. तत्काळ क्लास व्यवस्थापकांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. श्रेयसच्या पालकांना तातडीने माहिती देण्यात आली. मात्र, उपचार सुरू होण्याआधीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

आणखी वाचा   सायबर चोरांनी केली एक कोटी ६१ लाख ९८ हजार ९५२ रुपयांची फसवणूक