काळवीटांचा एनडीए रोडवर मुक्तपणे संचार

पुणे –

शहरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. आता त्यात भर पडली आहे ती राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीए परिसरात काळवीट दिसण्याची. मोकळ्या जागेत आणि रस्त्यावर ही काळवीट फिरताना नागरिकांच्या लक्षात आली आहेत. जगंली प्राणी मोठ्या प्रमाणात मानवी वस्तीजवळ येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

अन्न आणि पाण्याच्या शोधात जंगलातील वन्य प्राणी हळूहळू शहराच्या सीमेलगत येऊ लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी एनडीए परिसरात चार ते पाच काळवीट मुक्तपणे फिरताना दिसून आले. चांदणी चौक ते एनडीए कँपसकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर हे काळवीट फिरताना आढळली.

आणखी वाचा   आचार्य आनंदऋषीजी चौकातील दुमजली उड्डाणपूल सज्ज