पुणेकरांनी विचार पूर्वक मतदार करावे

पुणे :

वाहतूक कोंडी, वाढते प्रदूषण आणि गुन्हेगारीमुळे आज पुण्याची काय अवस्था झाली आहे. भाजप सत्तेत आल्यास पुढे आणखी काय अवस्था होईल, याचा विचार करून पुणेकरांनी मतदान केले पाहिजे,” असे आवाहन ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

महापालिका निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी थोरात पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, शहर वरिष्ठ उपाध्यक्ष अजित दरेकर, सरचिटणीस प्राची दुधाणे उपस्थित होते. थोरात म्हणाले, ‘तिजोरी ही जनतेच्या पैशांतून तयार होते. सत्तेवर जाणाऱ्यांनी त्या पैशांची जबाबदारीने काळजी घेतली पाहिजे. विकासाच्या नावाखाली होणारा खर्च हा पायाभूत सुविधा, दर्जेदार शिक्षण, आरोग्यासाठी व्हावा, कोणाच्या लांगूलचालनासाठी नव्हे.’

थोरात पुढे म्हणाले, ‘प्रचारात काँग्रेस आघाडीवर दिसली नाही, तरी काँग्रेस लोकांच्या मनात रुजलेली आहे. निवडणुका निकोप, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात झाल्यास काँग्रेसला यश मिळेल. अनेक मोठी पदे भूषवणारे नेते विविध आमिषे आणि दबावतंत्राला बळी पडून भाजपमध्ये गेले. त्यामुळे आज भाजपमध्ये काँग्रेसची विचारधारा असलेले अनेक चेहरे असून काँग्रेसयुक्त भाजप तयार झाली आहे. 

आणखी वाचा   पाळीव श्वान नोंदणीतील ढिसाळपणा उघड; शहरात नियमांवरच प्रश्नचिन्हमहापालिकेकडे केवळ साडेआठ हजार श्वानांची नोंद;