हर्षवर्धन दीपक मानकर यांना प्रभाग क्रमांक ११ (अ) रामबाग कॉलनी–शिवतीर्थनगर येथून अधिकृत उमेदवार 

पुणे :

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक ११ (अ) रामबाग कॉलनी–शिवतीर्थनगर येथील अधिकृत उमेदवार म्हणून  हर्षवर्धन दीपक मानकर यांनी कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे  नामनिर्देशन पत्र सादर केले.

प्रभाग क्रमांक ११ (अ) रामबाग कॉलनी–शिवतीर्थनगर प्रभागातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करण्याची आणि लोकहिताला प्राधान्य देण्याची भूमिका यानिमित्ताने त्यांनी यावेळी व्यक्त केली.

आणखी वाचा   सात किलोमीटर आधीच सिग्नलची माहिती; ‘कवच 4.0’मुळे रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित