पाषाण तलावातील प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबवा 

– महापौर यांचे निर्देश

पुणे :

पुणे शहरातील महत्त्वपूर्ण जलस्रोत असलेल्या पाषाण तलावातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर महापौर मॅडम यांनी आज तलाव परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला तातडीने अंमलबजावणी करत ठोस व परिणामकारक उपाययोजना राबविण्याचे कडक निर्देश दिले.

या पाहणीदरम्यान तलावातील पाण्याची गुणवत्ता, वाढता दूषितपणा तसेच सीओडी  व बीओडी यांच्या पातळीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तलावात येणाऱ्या सांडपाण्यामुळे प्रदूषणात लक्षणीय वाढ होत असल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात उभारण्यात आलेल्या एसटीपी प्रकल्पांची कार्यक्षमता तपासून, प्रक्रिया केलेले पाणी निर्धारित निकषांनुसारच तलावात सोडले जाईल यासाठी काटेकोर देखरेख ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

तसेच पुणे महानगरपालिकाच्या हद्दीपर्यंतचे नाले, पाणीप्रवाह व संबंधित यंत्रणांची सखोल पाहणी करण्यात आली. नाल्यांमध्ये साचलेला गाळ, अडथळे तसेच अनधिकृत सांडपाणी सोडण्याच्या प्रकारांवर तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. तलावात थेट जाणारे दूषित पाणी रोखण्यासाठी स्वतंत्र नाले उपयोजना प्रभावीपणे राबविण्याचे आदेशही देण्यात आले.

आणखी वाचा   हडपसर–मांजरी रस्त्यावर भीषण अपघात