पंजाब नॅशनल बँकेचा (पीएनबी) पुणे विभागाचा 132 वा वर्धापनदिन साजरा

पुणे :

पंजाब नॅशनल बँकेचा (पीएनबी) 132 वा स्थापना दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध उपक्रम आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी देवेंद्र सिंह (मंडळ प्रमुख) पंजाब नॅशनल बँक, पुणे मंडळ यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण, वॉल ऑफ ह्युमिनिटी या उपक्रमांतर्गत गरजू लोकांना कपडे आणि पुस्तके दान केली तसेच ग्राहक मेळाव्याचे देखील आयोजन केले  .

पुणे शहरातील सर्व नामवंत ग्राहकांनी मोठ्या उत्साहाने आणि सन्माननीय उपस्थितीने बँकेचा १३२ वा स्थापना दिवस साजरा केला. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या आपल्या ग्राहकांना संबोधित करताना देवेंद्र सिंह यांनी सांगितले की, ‘आमच्या बँकेची स्थापना 12 एप्रिल 1895 रोजी महान स्वातंत्र्यसैनिक पंजाब केशरी लाला लजपत राय जी यांनी केली होती. आज आपण संपूर्ण भारतात 132 वा स्थापना दिवस साजरा करत आहोत. हे आमच्या ग्राहकांच्या विश्वासाचे आणि आत्मीय भावनेची फलश्रुती आहे. आमची वाढ आपल्या ग्राहकांच्या समृद्धीमध्ये आहे. आम्ही वेळोवेळी ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करून उत्कृष्ट ग्राहक सेवा प्रदान करीत आहोत. तुम्हा सर्वांच्या पाठिंब्याने पुणे विभाग नवे विक्रम प्रस्थापित करत आहे.’

बँकेच्या 132 व्या स्थापना दिनानिमित्त देवेंद्र सिंह यांनी सर्व ग्राहकांचा सत्कार केला आणि त्यांना अधिक चांगल्या ग्राहक सेवेचे आश्वासन दिले. श्रीनिवास रेड्डी (सहाय्यक महाव्यवस्थापक) यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय ग्राहकांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुणे विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.

आणखी वाचा   शीतल तेजवानी हिला अखेर अटक