पुणे शहर भाजप माध्यम कक्षाचे उद्घाटन संपन्न

पुणे:

केंद्र आणि राज्य सरकार माध्यमातून नागरिक हिताची अनेक विकासकामे शहरात झाली आहे. पुण्यात मेट्रो विस्तार, सार्वजनिक वाहतूक सक्षम करणेसाठी  अधिक इ बसेस, २४/७ पाणी पुरवठा, वैद्यकीय महाविद्यालय, पुणे ते लोणावळा दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गास मंजुरी, विमानतळ नवीन टर्मिनल, चांदणी चौक विस्तारीकरण, पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. पुणेकर हे नेहमी विचार आणि कामाला साथ देतात त्याप्रमाणे मनपा निवडणुकीत नागरिक युतीला साथ देतील. केंद्र सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आणि पुण्यात दमदार विकास कामे सुरू आहे. पुण्याला विकासाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. पूर्ण ताकदीने आम्ही मनपा निवडणूक लढत असून पुण्याचा महापौर पुन्हा भाजपाचाच होईल असे मत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.

बाजीराव रस्ता येथील भारत भवन याठिकाणी पुणे शहर भाजप माध्यम कक्षाचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि महाराष्ट्र प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी माजी मंत्री दिलीप कांबळे, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार योगेश टिळेकर, माजी आमदार जगदीश मुळीक, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, संजय मयेकर, पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते. 

आणखी वाचा   जिल्हा परिषद निवडणुकीत पुण्यात भाजप विरोधात राष्ट्रवादी मोठी लढत