लाडकी बहीण योजना” चालूच राहणार – भाजपकडून मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम हमी

पुणे –

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका भारतीय जनता पक्षाने मांडली आहे. फडणवीस यांचा विश्वासार्ह चेहरा आणि महिला वर्गाशी असलेला संवाद यामुळे ही योजना विशेष लोकप्रिय ठरली आहे.
भाजपाने स्पष्ट केले की, फक्त हीच योजना नव्हे, तर महिला सबलीकरणासाठी राज्यसरकार राबवणाऱ्या सर्व केंद्र आणि राज्याच्या योजनाही पूर्णपणे चालू राहतील, त्यासाठी कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही.
योजनेत अडीच लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना लाभ मिळतो. या योजनेअंतर्गत महिलांच्या थेट बँक खात्यात दरमहिना 1,500 रुपये जमा केले जातात, ज्यामुळे घरबसल्या आर्थिक मदत मिळते आणि कोणत्याही मध्यस्थाची गरज पडत नाही.
पुण्यातील लाभार्थ्यांच्या खात्यात नोव्हेंबर, डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 या तीन महिन्यांचे एकत्रित ₹4,500 मकरसंक्रांतीपूर्वी (१४ जानेवारी) जमा होण्याची चिन्हे आहेत.
याशिवाय, जास्तीत जास्त पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा म्हणून ई-केवायसी अनिवार्य केले आहे. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत आहे, परंतु मुदतवाढ होण्याची शक्यता आहे.
भाजपने विरोधकांच्या योजनेबंदीबाबतच्या अफवा आणि भितीदायक प्रचाराचा पूर्णपणे निषेध केला असून, लाडक्या बहिणींना कोणताही धोका नाही, असा आश्वास दिला आहे.

आणखी वाचा   विविध पक्षांतील नऊ माजी नगरसेवकांचा अजित पवार गटात प्रवेश