मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पुण्यात मोठे खिंडार

पुणे:

पुण्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाचा तिढा सुटत असतानाच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पुण्यात मोठे खिंडार पडले आहे.

पक्षातील अंतर्गत निर्णयांवर नाराज असलेल्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे दिले आहेत. विशेष म्हणजे, या नाराज पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांच्याकडे सुपूर्द केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

पुणे शहरात शिवसेना शिंदे गटाला केवळ आठच जागा वाट्याला येत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून असंतोष खदखदत होता. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता निर्णय घेतल्याचा आरोप या राजीनामा दिलेल्या कार्यकर्त्यांनी केला आहे. “आम्ही रात्रंदिवस पक्षासाठी काम केले, मात्र निर्णय घेताना कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले गेले,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

आणखी वाचा   किरकोळ कारणांवरून वाढली हिंसक प्रवृत्ती; येरवडा हत्या प्रकरणांनी खळबळ