
देशी फुलांची थीम, २० ते २५ डिसेंबर पुण्यात रंगणार उत्सव



पुणे :
पुण्यातील कृषी महाविद्यालय मैदान, शिवाजीनगर (सिंचननगर) येथे दिनांक २० ते २५ डिसेंबर २०२५ या कालावधीत १९ वी भीमथडी जत्रा होणार आहे. अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, भीमथडी फौंडेशन व महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या सयुंक्त विद्यमाने आयोजित या जत्रेत महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे.
जत्रेची यावर्षी थीम देशी फुलं असून, महाराष्ट्रातील यशस्वी महिला उद्योजक या जत्रेत सहभाग घेणार आहेत. जत्रेचे औपचारिक उद्घाटन मा. सुनंदाताई पवार व इतर मान्यवरांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता होईल. पुणेकरांना सकाळी १० वाजल्यापासून जत्रेत प्रवेश मिळणार आहे.

















